मंगळवेढा- प्रतिनिधी |
श्री संत चोखोबा शिक्षण प्रसारक मंडळ हुन्नूर संचलित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा हुन्नूर तालुका मंगळवेढा या प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन विविध कला गुणदर्शन व बक्षीस वितरण समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला.गुरुवार दिनांक 26 डिसेंबर रोजी प्रशालेत आणि गेम्स घेण्यात आले. शुक्रवार दिनांक 27 डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा हुन्नूर या विद्यार्थ्यांचा विविध कला गुणदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे मार्गदर्शक प्रशांत साळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यामध्ये हिंदी मराठी गाणी ,भारुड ,लावणी, धनगरी ओवी यासारख्या गीतामधून आपले नृत्य सादरीकरण केले.
शनिवार दिनांक 28 डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता शेलापागोटे कार्यक्रम घेण्यात आला. बक्षीस वितरण समारंभ सोहळ्याचे उद्घाटन श्री संत चोखोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पुंडलिक साळे गुरुजी, सुशीला साळे माजी समाज कल्याण सभापती, संस्थेचे मार्गदर्शक प्रशांत साळे, संस्थेच्या मार्गदर्शिका पूर्वी साळे, ह भ प कविवर्य सूर्याजी भोसले, सुनिता रेवे सरपंच रेवेवाडी, मानतेस बिराजदार सरपंच लोणार, शिवाजी मेटकरी सरपंच मानेवाडी, कणसे कुटुंबीय, पांडुरंग काटकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.ह भ प कविवर्य सूर्याजी भोसले यांनी विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात पुस्तकाचे महत्व समजावून सांगितले. आजच्या काळात विद्यार्थी जीवनामध्ये मोबाईल ऐवजी हातात पुस्तक हवे. पुस्तकच आपल्याला जगातील ज्ञानाचे दरवाजे उघडे करून देतात. आणि आपण आपल्या ज्ञानावरच आपल्या आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करू शकतो. यावर आधारित कविता सादर करून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध करून सोडले. संस्थेच्या मार्गदर्शिका पूर्वी साळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माध्यमिकचे मुख्याध्यापक गुरुदेव स्वामी, प्राथमिकचे मुख्याध्यापक गोरखनाथ भोसले, सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
Please Share